प्रवासी म्हणू लागले थँक्यू तहसीलदार श्रीकांत निळे साहेब…
अवघ्या दोन मिनिटांत मिळतोय आता प्रवासी पास.
शेख वाजेद
जिल्ह्यात लॉकडाऊनच्या सुरुवातीस जिल्हांतर्गत, राज्यांतर्गत प्रवासासाठी परवानगी पास मिळू शकले नव्हते. चार ते पाच दिवस लागायचे. तो काही तासांचा अवधी कमी होऊन आता मिनिटांवर येेऊन ठेपला आहे. ते जिल्हाधिकारी नियुक्त संनियंत्रण अधिकारी तथा तहसीलदार श्रीकांत निळे यांच्यासह टीमच्या परिश्रमामुळे शक्य होत आहे. सद्यस्थितीत सर्व अर्ज निकाली काढले असून प्रलंबितता शून्यावर असते.
नियंत्रण कक्षातून प्राप्त माहितीनुसार, दि.21 मे रोजी सायंकाळी उशिरापर्यंत 26 हजार 627 नागरिकांना जिल्हांतर्गत, राज्यांतर्गत प्रवासासह अन्य बाबींची परवानगी देण्यात आलेली आहे. तर 15 हजार 535 नागरिकांचे अर्ज नाकारण्यात आले होते. त्यात अपूर्ण माहिती भरणे, चुकीची माहिती देणे आदी तांत्रिक कारणे देऊन अर्ज नाकारली आहेत. यात विशेष म्हणजे आता प्रलंबितता दररोज सायंकाळी शून्य असते. हे जिल्हाधिकारी नियुक्त संनियंत्रण अधिकारी तथा तहसीलदार श्रीकांत निळे यांच्यासह टीमच्या परिश्रमामुळे शक्य होत आहे. जिल्हावासियांना पासेस देण्याची जबाबदारी जिल्हाधिकार्यांनी त्यांच्यावर सोपविली होती. सुरवातीस हजारो अर्ज एकाच दिवस येत, त्यावेळी तहसीलदार निळे यांचा भ्रमणध्वनी क्रमांक जिल्हाधिकार्यांनी सार्वजनिक केल्याने त्यांना रात्रन् दिवस कॉल्स येत, त्यामुळे फोन घेताना त्यांची दमछाक झाली. अनेकांच्या जिल्हाधिकार्यांकडे तक्रारी होत्या, परंतु जिल्हाधिकार्यांनी निळे यांच्यासह टीमला वेळोवेळी कामात गती आणण्याच्या दृष्टीने सूचना केल्या. त्यानुसार टीमने परिश्रमही घेतले, परिणामी पास आता काही मिनिटात मिळू लागला आहे. दरम्यान, कोरोनाच्या भयानक परिस्थितीत नागरिकांना अत्यावश्यक बाबीसाठी पास मिळवून दिले. त्यांच्या कामाचे आजघडीला मात्र कौतुक होत आहे. तहसीलदार निळे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील संपूर्ण टीमचे ‘कोव्हिड योद्धे’ म्हणून समाजमाध्यमांवर कौतुकही होत आहे.