बीड

त्या दोन मृत्यूस जबाबदार कोण?आरोपीच्या पिंजऱ्यात असणारे चौकशी करणार


बीड – बीड च्या रुग्णालयात ऑक्सिजन कॉक बंद केल्याने दोन रुग्णाचा मृत्यू झाला या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक यांना चौकशीचे आदेश दिले खरे पण जे आरोपीच्या पिजऱ्यात आहेत ते काय चौकशी करणार असा सवाल उपस्थित करून संतप्त नातेवाईकांनी समिती स्थापन करून चौकशी करा अशी मागणी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांकडे केली आहे


बीड च्या जिल्हा रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी ऑक्सिजन अभावी तडफडून दोन उपचार घेणाऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला होता, या प्रकरणी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने अज्ञाताने ऑक्सिजन चा कॉक बंद केल्यामुळे ऑक्सिजन चा पुरवठा खंडित झाला अन दोन रुग्णांना प्राण गमवावे लागले असे स्पष्टीकरण दिले होते, ऑक्सिजन चा कॉक कोणी बंद केला ? जिल्हा रुग्णालयात सी सी टी व्ही नाहीत का ? याची जबाबदारी कोणाची अनेक सवाल उपस्थित होत आहे, या प्रकरणी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी चौकशी चे आदेश दिले आहेत, मात्र चौकशी कोण करणार तर खांद्यावर जबाबदारी असताना निष्क्रियता दाखवणारे जिल्हा रुग्णालय प्रशासन, स्वतः कडून झालेल्या चुकीची स्वतः चौकशी करणार असेल तर चौकशीतून काय निष्पन्न होणार , म्हणून मयताचे नातेवाईक संतप्त झाले आहेत, रुग्णाच्या मृत्यूस जबाबदार कोण हे शोधायचे असेल तर एक समिती स्थापन करा अन या समितीच्या माध्यमातून निपक्ष चौकशी करा अशी मागणी बीड चे जिल्हाधिकारी रविंद जगताप, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या कडे करण्यात आली आहे.