बीड

रेमडेसिव्हर इंजेक्शन आता तालुकास्तरावर उपलब्ध-उपजिल्हाधिकारी

बीड जिल्ह्यात रेमडीसिवर इंजेक्शन साठी लोकांना जिल्ह्यास्तरावर आता येण्याची गरज नाही हे इंजेक्शन आता तालुक्यातील तहसीलदार यांच्या माध्यमातून उपलब्ध केले जाणार असून तशा सूचना उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर यांनी दिल्या आहेत त्यामुळे रुग्णांना आता तालुकास्तरावर हे मिळणार आहे

सर्व तहसीलदार यांना सूचना करण्यात येते की, त्यांचे तालुक्याचे कार्यक्षेत्रातील खाजगी कोविंड हॉस्पिटल मध्ये भरती असलेले रुग्णांना ,जर त्यांचे फिजिशियन यांनी रेमडीसिविर इंजेक्शन देणे आवश्यक आहे अशी शिफारस केली असल्यास, आपले स्तरावर त्यांची यादी करून मेलवर इकडील कार्यालयास पाठवावी.
संबंधित तालुक्याचे तहसीलदार आणि मेडिकल सुपरिटेंडेंट यांना इंजेक्शनचा पुरवठा करता येईल जेणेकरून रुग्णांना बीड मुख्यालय येऊन आयटीआय येथे रांगेत उभे राहण्याची आवश्यकता पडणार नाही .
बीड जिल्ह्यात रेमडीसिविर इंजेक्शनचा पुरवठा होईल त्यानुसार तो एजन्सीकडून उपलब्ध करून घेऊन अनुक्रमे आपले नोंदणी प्रमाणे प्रत्येक रुग्णास एक याप्रमाणे त्यांचे रुग्णालयास (कोविड हॉस्पिटल )वाटप करण्याची दक्षता घ्यावी अशा सूचना उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर यांनी केल्या आहे त्यामुळे तालुका स्तरावरील रुग्णांसाठी रेमडेसिव्हर उपलब्ध होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी

आज दिनांक 25 एप्रिल 2021 रविवार रोजी सुद्धा आयटीआय येथे रेमडीसीविर इंजेक्शन साठी दुपारी 12:30 पासून नोंदणी करता येईल
आज बाहेरच्या तालुक्यातले रुग्णांसाठी देखील नोंदणी होईल तथापि उद्यापासून त्यांनी त्यांचे तालुक्याला नोंदणी करावी मुख्यालय येण्याची आवश्यकता असणार नाही
उपजिल्हाधिकारी बीड