बीड

बीड जिल्ह्यातील हजारो रुग्ण कोरोनामुक्त होऊ लागले:आज 899 रुग्णांना डिस्चार्ज

बीड- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे त्याच तुलनेत बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील अधिकच आहे,नागरिकांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आणि डॉक्टरांच्या अथक प्रयत्नातून शेकडो रुग्ण बरे होऊन घरी जात आहे आज तब्बल 899 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत त्यांना आजच डिस्चार्ज देण्यात आला आहे

सध्या बीड जिल्ह्यात 46055 एकूण कोरोना बाधीत संख्या असून यापैकी 39583 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट 12.66 असून बरे होण्याचे प्रमाण 85.94%आहे तर मृत्यू दर 1.78% आहे

सध्या 3797 बेड शिल्लक असून सध्या 5648 रुग्णांवर उपचार सुरू आहेत बीड जिल्ह्यात 118 ठिकाणी रुग्णांची व्यवस्था करण्यात आली असून 9445 बेड बीड जिल्ह्यात आहेत, जिल्हा प्रशासनाने शासकीय रुग्णालय याबरोबरच जिल्ह्यातील मोठमोठे खाजगी दवाखाने रुग्णांसाठी आरक्षित केले आहेत आज पुन्हा नवीन 6 कोविड केअर सेन्टर उपलब्ध करण्यात आले आहेत सध्या जिल्ह्यात 118 ठिकाणी कोविड केअर सेंटरवर उपचारासाठी सुविधा तयार करण्यात आली आहे,सर्वांनी प्रशासनाचे नियमांचे पालन करावे,आपली आपल्या माणसांची काळजी घ्यावी