बीड जिल्ह्यात आज 1195 पॉझिटिव्ह
बीड जिल्ह्यात आज 1195 पॉझिटिव्ह:अंबाजोगाई 194, आष्टी 201 ,बीड 208 गेवराई 124,केज 130
बीड जिल्ह्यात आज दि 24 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4398 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1195 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3203 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
अंबाजोगाई 194 आष्टी 201 बीड 208 धारूर 50 गेवराई 124 केज 130 माजलगाव 59 परळी 72 पाटोदा 65 शिरूर 58 वडवणी 34
गेल्या २४ तासांत राज्यात ६६ हजार ८३६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ७७३ जणांच्या मृत्यू नोंद झाली आहे.
त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४१ लाख ६१ हजार ६७६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ६३ हजार २५२ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज ७४ हजार ४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आतापर्यंत एकूण ३४ लाख ४ हजार ७९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.८१ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५२ टक्के एवढा आहे.तर ६ लाख ९१ हजार ८५१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
24 तासात देशात कोरोनाचे 3,45,147 नवे रुग्ण
शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंतच्या 24 तासात देशात कोरोनाचे 345,147 नवे रुग्ण आढळले आहेत. तर, यादरम्यान 2621 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही नवे उच्चांक गाठत आहे.
देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढून 1,89,549 वर पोहोचली आहे.
देशात 25,43,914 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे संख्या एकूण बाधितांच्या 15.3 टक्के आहे. याआधी गुरुवारी कोरोनाचे नवे 3.32 लाख रुग्ण आढळले होते. तर, 2250 जणांचा मृत्यू झाला होता. भारतानं दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत अमेरिकेलाही मागे टाकलं असून भारत जगभरात पहिल्या स्थानी पोहोचला आहे.कोरोना संक्रमित रुग्णांच्या बरं होण्याचा दर 83.5 इतका झाला आहे. तर, कोरोनानं होणाऱ्या मृत्यूच्या संख्येचा दर घटून 1.1 टक्के इतका झाला आहे.