बीड

बीड जिल्ह्यात आज 1210 पॉझिटिव्ह:अंबाजोगाई 234, आष्टी 165 ,बीड 227 केज 129

बीड जिल्ह्यात आज दि 23 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3971 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1210 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2761 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 234 आष्टी 165 बीड 227 धारूर 49 गेवराई 87 केज 129 माजलगाव 57 परळी 107 पाटोदा 88 शिरूर 31 वडवणी 36

गेल्या २४ तासांत राज्यात ६७ हजार १३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५६८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४० लाख ९४ हजार ८४०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ६२ हजार ४७९ जणांचा मृत्यू झाला आहे.

गुरुवारी नोंद झालेल्या एकूण ५६८ मृत्यूंपैकी ३०९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १५८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.

तसेच काल दिवसभरात ६२ हजार २९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण ३३ लाख ३० हजार ७४७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.३४ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५३ टक्के एवढा आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

गेल्या 24 तासात 3 लाख 32 हजार 503 नवीन कोरोना संक्रमित झाले. यावेळी, 2256 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. भारतातील कोरोना रुग्णाच्या वाढीने जगातील सर्व देशांचे विक्रम मोडले आहेत.
देशातील साथीच्या आजारामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूची संख्या 1,86,927 वर पोहचली आहे. आतापर्यंत, कोरोनाची एकूण संख्या 1,62,57,164 पर्यंत वाढली आहे. देशात उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 24,21,970 वर पोहचली आहे. संक्रमित लोकांच्या एकूण संख्येपैकी हे 14.9 टक्के आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक 67,013 नवीन संक्रमण झाले आहे. यानंतर उत्तर प्रदेशमध्ये 34254, दिल्लीत 26169, कर्नाटकमध्ये 25795, केरळमध्ये 26995 आणि छत्तीसगडमध्ये 16750 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. एकूण आठ संक्रमणांपैकी या आठ राज्यांमध्ये .59.2 टक्के वाटा आहे.

संक्रमित झालेल्यांची संख्या राज्यानुसार :-
महाराष्ट्र :- 67,013
उत्तर प्रदेश :- 34,254
दिल्ली;- 26,189
कर्नाटक :- 25,795
केरल :- 26,995
राजस्थान :- 14,468
छत्तीसगढ़ :- 16,750
मध्य प्रदेश :- 12,384
गुजरात :- 13,105
बिहार :-11,489