बीड जिल्ह्यात आज 1145 पॉझिटिव्ह:अंबाजोगाई 205, आष्टी 138 ,बीड 226 केज 119
बीड जिल्ह्यात आज दि 22 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4690 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1145 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3545 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
अंबाजोगाई 205 आष्टी 138 बीड 226 धारूर 43 गेवराई 116 केज 119 माजलगाव 65 परळी 77 पाटोदा 91 शिरूर 33 वडवणी 32
राज्यात बुधवारी दिवसभरात 67,468 नवे रुग्ण
महाराष्ट्रात बुधवारी दिवसभरात 67,468 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 40 लाख 27 हजार 827 इतकी झाली आहे. तर 586 बळींमुळे मृतांचा आकडा 61,911 वर पोहोचला. दिवसभरात 54,985 रुग्ण बरे झाल्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 32 लाख 68 हजार 449 इतकी झाली.
सध्या राज्यात 6 लाख 95 हजार 774 सक्रिय रुग्ण आहेत
देशात पहिल्यांदाच 3 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद
देशात कोरोना विषाणूचे संक्रमण वेगाने वाढत असून पहिल्यांदाच 3 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासामध्ये देशात 3,14,835 रुग्ण सापडले आहेत, तर 2104 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांवर गेला होता, मात्र वाढत्या रुग्णसंख्येमुळे हा दर आता 85.01 टक्क्यांवर आला आहे. सध्या देशात 22 लाख 91 हजार 498 सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत 1 कोटी 34 लाख 54 हजार 880 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.