काकू नाना प्रतिष्ठाणच्या वतीने 3 मोठ्या ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन
बीड दि.22 (प्रतिनिधी)ः- माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली काकू-नाना प्रतिष्ठाणच्या वतीने लहान मुलांसाठी चित्रकला, महिलांसाठी रांगोळी आणि प्रौढांसाठी निंबध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या तीनही स्पर्धा ऑनलाईन असून स्पर्धकांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आले आहे.
सध्या राज्यात आणि देशात कोरोनामुळे लॉकडाऊन चालू आहे. बीड जिल्ह्यात या लॉकडाऊनच्या काळात नागरीकांमध्ये भितीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले असून एक प्रकारची उदासीनता आणि नकारात्मकता वाढू लागली आहे. नागरीकांमध्ये सकारात्मक चैतन्य निर्माण व्हावे, आपल्या कला गुणांना आणि विचारांना व्यासपीठ मिळावे यासाठी काकू-नाना प्रतिष्ठाणच्या वतीने 3 स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांसाठी तीनही स्पर्धेत प्रथम येणार्यास प्रत्येक 10 हजार रूपये प्रथम बक्षीस प्रत्येक स्पर्धेतील द्वितीय विजेत्यास 5 हजार रूपये व प्रत्येक स्पर्धेतील तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास 3 हजाराचे बक्षीस देण्यात येणार आहे.
महिलांसाठी रांगोळी स्पर्धा – कोरोना जनजागृती, कारोना काळातील मानवरूपी देव, लॉकडाऊनमधील जीवन या विषयावर घराच्या बाहेर अंगणात ही रांगोळी काढून रांगोळीचा आणि रांगोळीसहित घराचा फोटो सोबत स्पर्धकाचे नाव, पत्ता, फोन नंबर पाठवावा.
भव्य निबंध लेखन स्पर्धा – कोरोनामुळे झालेला माझ्यातील बदल, लॉकडॉऊनने आम्हाला काय शिकवले यापैकी कोणत्याही एका विषयावर 1500 ते 2 हजार शब्दापर्यंत निबंध स्वलिखित असावा. या स्पर्धेत 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रौढ व त्यापुढील ज्येष्ठ नागरीकांपर्यंतच्या वयाचे स्त्री-पुरूष स्पर्धक सहभागी होऊ शकतात. निबंधासोबत नाव, पत्ता, मोबाईल नंबर व आपले आधारकार्ड देणे बंधनकारक आहे.
लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा – लॉकडाऊनमुळे जीवन, कोरोनाकाळातील मानवरूपी देव, कोरोनापासून बचाव करणारे संदेश यापैकी कुठल्याही एका विषयावर चित्र काढायचे आहे. ही स्पर्धा इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. चित्रासोबत पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, शाळा, ओळखपत्र बंधनकारक राहील. रंगवलेल्या चित्राच्या दोन प्रती पाठवाव्यात.
सदरील स्पर्धेतील आपले साहित्य दि.01 जून 2020 पर्यंत bangla5555@gmail.com या मेलवर पाठवावे. सर्व सहभागी विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षीस देऊन ऑनलाईन प्रमाणपत्राचे वितरण केले जाणार आहे तसेच प्रत्येक स्पर्धेतील 5 स्पर्धकांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी अजिंक्य मुळे 9960977642 यांच्याशी संपर्क साधावा. सदरील स्पर्धेचा अंतिम निर्णय परिक्षकांचा असेल. या तीनही स्पर्धांमध्ये बीड आणि मतदारसंघातील स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन काकू-नाना प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आले आहे.