महाराष्ट्रमुंबई

एसटी बसेस केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच चालणार-परिवहनमंत्री अनिल परब

राज्यातील वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून निर्बंध अधिक कडक केले जात आहेत. या पार्शभूमीवर आज राज्याच परिवहनमंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना एक महत्वपूर्ण माहिती दिली. एसटी बसेस केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच चालणार असल्याचं त्यांनी सांगितलं

यावेळी अनिल परब म्हणाले “जिल्हांतर्गत, जिल्ह्याबाहेर देखील चालतील परंतु त्या केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच चालणार आहेत.या संदर्भात एसटीचा संपूर्ण कार्यक्रम कसा असेल? याची चर्चा करण्यासाठी मंत्रालयात अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आलेली आहे. या बैठकीनंतर अंतिम निर्णय होईल. परंतु आता सरकारने ज्या काही गाइडलाईन्स दिलेल्या आहेत, त्यानुसार दोन्ही ठिकाणी एसटी चालतील फक्त या एसटी बस अत्यावश्यक सेवेसाठीच चालतील.”

तसेच, “त्या संदर्भात आता जे काही निकष आहेत, जिल्हाबाहेरील लोकांना येण्यासाठी किती दिवस विलगीकरणात ठेवयाचं?कशा पद्धतीने ठेवायचं? त्यांच्या हातावर शिक्के कसे मारायचे? या सगळ्या गोष्टींच्या निर्णयासाठी मंत्रालयाब बैठक होणार आहे. एसटी संख्या देखील कमी होईल, कारण नेहमीप्रमाणे एसटी चालणार नाहीत. गाइडलाईन्सचे तंतोतंत पालन केले जाईल. एक जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जर लोकं जाणार असतील, तर सरकारने म्हटल्यानुसार त्यांना हातावर शिक्के मारून १४ दिवस विलगीकरणात रहावं लागेल.”