ऑक्सिजन गळतीच्या घटनेत 22 जणांचा मृत्यू-जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची माहिती
नाशिक : नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. या ऑक्सिजन गळतीच्या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. राज्यभरात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा असताना नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. 13 KL क्षमतेचा हा ऑक्सिजन टँक होता. ऑक्सिजन टँकरमध्ये गळती झाल्याने तो सर्वत्र पसरला आहे. या गळतीनंतर ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा तास खंडित झाला होता.
व्हेंटिलेटरवर असलेल्य़ा रुग्णांना ऑक्सिजन प्रेशर कमी पडल्यामुळं त्यांचा मृत्यू झाला असल्याचं मांढरे यांनी सांगितलं.
त्यांनी सांगितलं की, ही एक खाजगी कंपनीची टाकी आहे. रिफिल करण्याकरता आणि मेंटेनन्सकरता टॅंकर आला होता. त्यात काही टेक्निशियन्स होते. तो टॅंकर रिफिल करण्यात आला होता, असं आयुक्तांनी सांगितलं, मात्र दरम्यानच्या काळात झालेल्या विस्कळीतपणामुळं ही घटना घडली, असं जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितलं. याबाबत सर्व माहिती शासन स्तरावर माहिती कळवली आहे, असं त्यांनी सांगितलं