बीड

बीड जिल्ह्यात आज 1047 पॉझिटिव्ह:बीड 223 अंबाजोगाई 176 आष्टी 124 ,केज 125

बीड जिल्ह्यात आज दि 21 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4576 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1047 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3529 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 176 आष्टी 124 बीड 223 धारूर 43 गेवराई 101 केज 125 माजलगाव 48 परळी 90 पाटोदा 51 शिरूर 35 वडवणी 31

देशात 2 लाख 95 हजार 41 रुग्ण बाधीत

देशात, मंगळवारी (२० एप्रिल २०२१) रोजी एकूण २ लाख ९५ हजार ०४१ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर याच २४ तासांत देशात तब्बल २ हजार ०२३ करोनाबाधित रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. देशात मंगळवारी एकूण १ लाख ६७ हजार ४५७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या आकडेवारीसोबतच भारतानं करोना संक्रमणाचे गेल्या वर्षभरातील सगळे रेकॉर्ड तोडत नवीन रेकॉर्ड तयार केलेले आहेत. देशात एका दिवसात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येत मृत्यूंची नोंद करण्यात आलीय.
देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ५६ लाख १६ हजार १३० वर पोहचलीय. या रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत किंवा हे रुग्ण डॉक्टरांच्या निर्देशावर आपल्या घरीच आयसोलेशनमध्ये राहून उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत देशात एकूण १ लाख ८२ हजार ५५३ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. सध्या देशात २१ लाख ५७ हजार ५३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.