बीड जिल्ह्यातील कोरोनाचा प्रकार कसा !
संशोधनासाठी ICMR चे पथक बीड मध्ये दाखल, सर्वे चे काम सुरू
बीड – केंद्र सरकारच्या ICMR संस्थेचे 20 सदस्य असलेले एक पथक शुक्रवारी सकाळी बीड जिल्ह्यात दाखल झाले , संशोधनासाठी वेगवेगळ्या तालुक्यातील प्रभागमधील नागरिकांच्या रक्ताच्या चाचण्या हे पथक घेत आहे..
नियमित संशोधन आणि शरीरातील अँटी बॉडीज अन कोरोनाचे बदलते स्वरूप या साठी ICMR या संस्थेचे 20 जणांचे एक पथक बीड जिल्ह्यात दाखल झाले , शुक्रवारी सकाळी थेट सर्वे ला सुरुवात झाली दिवसभर दहा तालुक्यासाठी दहा पथक सर्वेक्षण करत आहे हे पथक प्रत्येक तालुक्यातील ठराविक प्रभागातील किमान 40 ते 50 नागरिकांच्या रक्ताची चाचणी घेत आहेत,भारतीय बनावटीचे एलिझा किट चा वापर करून हे पथक संशोधन करत आहे, या प्रत्येक पथकात संस्थेचे दोन सदस्यांसह तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी यात आहेत मराठवाड्यातील बीड सह इतर तीन जिल्ह्यात ते जाणार आहेत,