बीड

आजही खुश खबर:बीड जिल्ह्यात आज 687 रुग्ण बरे होऊन घरी गेले

बीड- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या जरी दिसत असली तरी दुसरीकडे मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आणि डॉक्टरांच्या अथक प्रयत्नातून शेकडो रुग्ण बरे होऊन घरी जात आहे आज शनिवारी तब्बल 687 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत त्यांना आजच डिस्चार्ज देण्यात आला आहे

बीड जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 86.15 टक्के इतका आहे सध्या बीड जिल्ह्यात 2988 बेड शिल्लक असून ऊन 4698 रुग्णांवर उपचार सुरू आहेत

बीड जिल्ह्यात 93 ठिकाणी रुग्णांची व्यवस्था करण्यात आली असून 7686 बेड बीड जिल्ह्यात आहेत, जिल्हा प्रशासनाने शासकीय रुग्णालय याबरोबरच जिल्ह्यातील मोठमोठे खाजगी दवाखाने रुग्णांसाठी आरक्षित केले आहेत बीड जिल्ह्यात आतापर्यंत 39 हजार 313 बाधित रुग्णांची संख्या असून यापैकी 33874 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे

आता बीड जिल्ह्याचा पॉझिटिव रेट 11.65 टक्के इतका आहे जिल्ह्याची रुग्ण वाढ दिसत असली तरी करोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील समाधान कारक आहे आज पुन्हा नवीन 4 कोविड केअर सेन्टर रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत