बीड

बीड जिल्ह्यात आज 1145 पॉझिटिव्ह:बीड 276 अंबाजोगाई 219 आष्टी 149 केज 131,गेवराई 89

बीड जिल्ह्यात आज दि 18 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4725 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1145 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3580 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 219 आष्टी 149 बीड 276 धारूर 38 गेवराई 89 केज 131 माजलगाव 91 परळी 59 पाटोदा 47 शिरूर 31 वडवणी 15

राज्यात आणि देशात 24 तासात झालेली नोंद

महाराष्ट्रातही सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची आकडेवारी धडकी भरवणारी असून आज 67 हजार 123 नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. आज 56 हजार 783 कोरोनाबाधित बरे झाले आहेत. एकूण 30 लाख 61 हजार 174 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज 419 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 59 हजार 970 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण 6 लाख 47 हजार 933 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.18 टक्के झाले आहे.

देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ होत आहे. देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज विक्रमी नोंद होत असून मृत्यूदरातही वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 2 लाख 61 हजार 500 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर कोरोनामुळे 1 हजार 501 बाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात दिलासा देणारी बाब म्हणजे, गेल्या 24 तासांत देशात 1,38,423 लोकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. शुक्रवारी 234,692 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती.