बीड

उद्यापासून किराणा दुकान सह किरकोळ विक्रेत्यांच्या वेळेत बदल:जिल्हाधिकार्‍यांचा आदेश

कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने लावण्यात आलेले निर्बंध काही प्रमाणात वेळेत बदल करण्यात येत असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे उद्या दिनांक 19 एप्रिल सोमवारपासून किराणा दुकाने भाजीपाला फळ विक्री चिकन-मटण विक्रीची दुकाने बेकरी,इत्यादी सकाळी 7 ते 11 यावेळेत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे तर हातगाडी फळ विक्री सांयकाळी 5 ते 7 यावेळेत चालू राहील असे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी जारी केले आहेत