बीड जिल्ह्यात आज 1211 पॉझिटिव्ह:बीड 143 अंबाजोगाई 337 आष्टी 119 केज 112,परळी 138
बीड जिल्ह्यात आज दि 17 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4262 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1211 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3051 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
अंबाजोगाई 337 आष्टी 119 बीड 143 धारूर 47 गेवराई 39 केज 112 माजलगाव 65 परळी 138 पाटोदा 99 शिरूर 53 वडवणी 59
राज्यात ४५ हजार ३३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले
शुक्रवारी दिवसभरात ६३ हजार ७२९ नवीन कोरोना रूग्णांची भर पडली आहे. तर, ३९८ कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ दिवसासाठी निर्बंध लागू करण्यात आले असले तरी संसर्गाचा आलेख वरचाच आहे. शुक्रवारी राज्यात ६३ हजार ७२९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून आता राज्यातील काेरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३७ लाख ३ हजार ५८४ झाली आहे. तर, एकूण ६ लाख ३८ हजार ३४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ८१.१२ टक्क्यांवर आले आहे. आज ४५ हजार ३३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण ३० लाख ४ हजार ३९१ काेरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत
देशात गेल्या 24 तासात 1 लाख 23 हजार 354 जणांना डिस्चार्ज
नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दररोज नवनवे विक्रम गाठताना दिसत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे 2 लाख 34 हजार 692 नवीन रुग्ण भारतात आढळले आहेत. 1 लाख 23 हजार 354 जणांना डिस्चार्ज मिळाला, तर 1341 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
कोरोनाग्रस्तांची आकडेवारी
गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 2 लाख 34 हजार 692 नवीन रुग्ण
गेल्या 24 तासात कोरोनामुळे 1 हजार 341 जणांचा मृत्यू
गेल्या 24 तासात 1 लाख 23 हजार 354 जणांना डिस्चार्ज देण्यात आला
एकूण कोरोना बाधित 1 कोटी 45 लाख 26 हजार 609 वर
आतापर्यंत 1 कोटी 26 लाख 71 हजार 220 जणांना देण्यात आला डिसचार्ज
देशात 16 लाख 79 हजार 740 जणांवर उपचार सुरु
आतापर्यंत कोरोनामुळे 1 लाख 75 हजार 649 जणांचा मृत्यू
आतापर्यंत देशात 11 कोटी 99 लाख 37 हजार 641 लसीकरण