पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल 24 तासांत व्हॉट्सअॅपवर द्या, हायकोर्टाचे आदेश
पॉझिटिव्ह रुग्णांचे आरटीपीसीआर चाचणी अहवाल 24 तासांत तत्काळ व्हॉट्सअॅपवर पाठवावे. तसेच सर्व सरकारी व खासगी लॅबरोटरीजने रुग्णांचा अहवाल इंडियन काैन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या पोर्टलवर 24 तासांत अपलोड करावा, असे आदेश गुरुवारी हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिले. या आदेशाचे पालन न केल्यास प्रशासनाने लॅबरोटरीजवर योग्य कारवाई करावी, असेही हायकोर्टाने म्हटले आहे. न्या. झेड. ए. हक आणि न्या. अमित बोरकर यांनी डॉ. मुकेश चांडक यांनी दाखल केलेला मध्यस्थी अर्ज निकाली काढला. मध्यस्थीतर्फे कोर्टमित्र अॅड. श्रीरंग भांडारकर, राज्य सरकारतर्फे अॅड. डी. पी. ठाकरे, केंद्रातर्फे अॅड. उल्हास औरंगाबादकर यांनी बाजू मांडली.