बीड

बीड जिल्ह्यात आजही आकडा वाढताच:963 पॉझिटिव्ह:अंबाजोगाई 230 आष्टी 116,बीड 167,केज 106

बीड जिल्ह्यात आज दि 15 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3799 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 963 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2836 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

जिल्ह्यात आजही दिलासादायक बातमी आहे 559 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून बीड जिल्ह्यात सध्या 3953 रुग्ण उपचार घेत आहेत तर 3149 बेड सध्या उपलब्ध आहेत एकूण 7102 बेडची व्यवस्था करण्यात आली असून 84 ठिकाणी कोरोना रुग्णांना दाखल करण्याची व्यवस्था आरोग्य प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे बीड जिल्ह्याची एकूण बाधित संख्या 35952 इतकी झाली असून आत्तापर्यंत 734 जणांचा मृत्यू झाला आहे सध्या एकूण कोरोना मुक्त रुग्णांची संख्या 31 हजार 265 इतकी आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 230 आष्टी 116 बीड 167 धारूर 25 गेवराई 49 केज 106 माजलगाव 70 परळी 69 पाटोदा 59 शिरूर 43 वडवणी 29

राज्यात २४ तासांत ५८ हजार ९५२ नवे कोरोना रुग्ण

मुंबईः महाराष्ट्रात २४ तासांत ५८ हजार ९५२ नवे कोरोना रुग्ण आढळले. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या कोरोना रुग्णांपैकी ३९ हजार ६२४ जण मागील २४ तासांत कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळे राज्यात २४ तासांत २७८ मृत्यू झाले.
आतापर्यंत महाराष्ट्रात ३५ लाख ७८ हजार १६० कोरोनाबाधीत आढळले. यापैकी २९ लाख ५ हजार ७२१ कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळे ५८ हजार ८०४ जणांचा मृत्यू झाला. तसेच कोरोना झालेल्यांपैकी १ हजार ५६५ जणांचा इतर कारमांमुळे मृत्यू झाल्याची माहिती राज्य शासनाने दिली. सध्या महाराष्ट्रात ६ लाख १२ हजार ७० कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत

बुधवारी भारतात पहिल्यांदाच दोन लाखांहून रुग्ण आढळले आहेत.

विशेष म्हणजे, करोनाच्या दुसऱ्या लाटेत लहानग्या रुग्णांचाही समावेश आहे. रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्यानं लहानग्यांच्या मृत्यूचंही प्रमाण वाढताना दिसून येतंय.
बुधवारी २४ तासांत करोनाबाधित एकूण २ लाख ७३९ रुग्णांची भर पडलीय. भारतात करोना दाखल झाल्यापासूनचा हा देशातील एका दिवसाचा सर्वात मोठा आकडा ठरलाय. याच २४ तासांत १ हजार ०३८ करोनाबाधित रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत.


आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ४० लाख ७४ हजार ५६४ वर पोहचलीय. तर आतापर्यंत देशात एकूण १ लाख ७३ हजार १२३ नागरिकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. सध्या देशात १४ लाख ७१ हजार ८७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.