गेवराईबीड

कोळगावात गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातील कोळगाव सह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस झाला यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे,सध्या काही शेतात उन्हाळी बाजरी,ज्वारी हरबरा ,तीळ भुईमूग आदि पिके आहेत तर काहींनी ज्वारीची काढणी करून खळे करण्याची तयारी केली होती तसेच अनेक फळबागांचे देखील मोठे नुकसान झाले आहे

गेवराई तालुक्यात बुधवारी सायंकाळी 6 पासून मोठ्या प्रमाणात गारपीट झाली असून शेतकऱ्यांचे मोठ नुकसान झाले आहे. गेवराई तालुक्यामध्ये कोळगाव कवडगाव, सावरगाव, तांदळा काजळा चकलंबा या परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गारांचा सडा पडला होता.
वादळी वारा विजांचा कडकडाट आणि गारा यामुळं डाळिंब, टरबूज, खरबूज आणि पेरूच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

मध्यरात्रीपर्यंत बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली होती यात गारपीट झाल्यामुळे आंबा फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अगोदरच लागल्यामुळे शेतकरी गारपीटमुळे पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
वादळी वाऱ्यामुळे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या गारपीटीचा फटका सर्वात जास्त गेवराई तालुक्यामध्ये बसला असून कोळगाव गावात तर पांढरा शुभ्र गारांचा सडा आणि त्यामध्ये वाहणारे पाणी पाहायला मिळालं. गारपीटीचा फटका जनावरांनाही बसला आहे.