बीड

बीड जिल्ह्यात आजही आकडा वाढताच:928 पॉझिटिव्ह:अंबाजोगाई 252 आष्टी 112,बीड 246

बीड जिल्ह्यात आज दि 14 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3554 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 928 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2626 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

जिल्ह्यात आज दिलासादायक बातमी आहे 625 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून बीड जिल्ह्यात सध्या 3782 रुग्ण उपचार घेत आहेत तर 3050 बेड सध्या उपलब्ध आहेत एकूण 6832 बेडची व्यवस्था करण्यात आली असून 82 ठिकाणी कोरोना रुग्णांना दाखल करण्याची व्यवस्था आरोग्य प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे बीड जिल्ह्याची एकूण बाधित संख्या 34989 इतकी झाली असून आत्तापर्यंत 729 जणांचा मृत्यू झाला आहे सध्या एकूण कोरोना मुक्त रुग्णांची संख्या 30 हजार 478 इतकी आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 252 आष्टी 112 बीड 246 धारूर 41 गेवराई 55 केज 69 माजलगाव 51 परळी 40 पाटोदा 20 शिरूर 24 वडवणी 28

मुंबई – राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक प्रचंड झपाट्याने वाढतेय. त्यामुळे नागरिकांनी मास्क लावणे, वारंवार हात धुवणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत आवश्यक आहे. राज्यात मंगळवारी नव्या रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला. काल दिवसभरात महाराष्ट्रात 60,212 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 281 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 31,624 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यासह महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 35,19,208 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 58,526 इतका झाला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत 28,66,097 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर सध्या 5,93,042 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मागील 24 तासांत देशात तब्बल 1,84,372 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 1,027 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 1,38,73,825 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 1,72,085 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात 82,339 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 1,23,36,036 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या 13,65,704 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.