ऑनलाइन वृत्तसेवादेशनवी दिल्ली

सीबीएससी बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द:तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली – केंद्र सरकारने सीबीएससी बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. वाढत्या कोरोनाच्या फैलावामुळे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर शिक्षण मंत्रालयाने हा निर्णय जाहीर केला. दहावीच्या परीक्षांचा निकाल हा सीबीएससी बोर्डाने तयार केलेल्या ऑब्जेटिव्ह निकषांनुसार लावण्यात येईल आणि योग्य वेळी तो जाहीर करण्यात येईल.

बारावीची परीक्षा पुढे ढकलली असून तिची पुढील तारखा कोविड परिस्थितीचा आढावा घेऊन नंतर जाहीर करण्यात येईल, असेही शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
या आधी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी सीबीएससी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले होते. अखेर हा निर्णय सरकारने जाहीर केला आहे.

बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा तर दहावीची परीक्षा रद्द

केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं दहावीच्या परीक्षा रद्द केल्याची माहिती दिली आहे.
दहावीचा निकाल सीबीएसई बोर्डाकडून वस्तूनिष्ठ पद्धतीनं तयार करण्यात आलेल्या मानाकांच्या आधारे जाहीर करण्यात येणार आहे. तर, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षा घेण्यासंदर्भात 1 जूनला परिस्थितीची पाहणी करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं दिली आहे. त्यामुळे सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा जूनपर्यंत होणार का? हे पाहावं लागेल.