बीड जिल्ह्यात आज 1018 पॉझिटिव्ह:अंबाजोगाई 243आष्टी 98,बीड 216,केज 119,तर परळी 140
बीड जिल्ह्यात आज दि 13 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4183 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1018 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3165 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
जिल्ह्यात आज दिलासादायक बातमी आहे 528 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून बीड जिल्ह्यात सध्या 3733 रुग्ण उपचार घेत आहेत तर 2494 बेड सध्या उपलब्ध आहेत एकूण 6227 बेडची व्यवस्था करण्यात आली असून 75 ठिकाणी कोरोना रुग्णांना दाखल करण्याची व्यवस्था आरोग्य प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे बीड जिल्ह्याची एकूण बाधित संख्या 34 हजार 61 इतकी झाली असून आत्तापर्यंत 722 जणांचा मृत्यू झाला आहे सध्या एकूण कोरोना मुक्त रुग्णांची संख्या 29 हजार 606 इतकी आहे
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
अंबाजोगाई 243 आष्टी 98 बीड 216 धारूर 28 गेवराई केज 119 माजलगाव 34 परळी 140 पाटोदा 56 शिरूर 20 वडवणी 14
राज्यात गेल्या 24 तासांत 51 हजार 751 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. समाधानाची बाब म्हणजे सोमवारी कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासांत 52,312 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. सोमवारी 258 जणांना कोरोना विषाणूने बळी घेतला आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत 58 हजार 245 रुग्णांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यात आतापर्यंत 34 लाख 58 हजार 996 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 28 लाख 34 हजार 473 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 5 लाख 64 हजार 746 सक्रिय रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.