बीड

बीड जिल्ह्यात आज तब्बल 1062 पॉझिटिव्ह:अंबाजोगाई 223 आष्टी 193,बीड 220,केज 106

बीड जिल्ह्यात आज दि 11 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 5681 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1062 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 4619 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 223 आष्टी 193 बीड 220 धारूर 30 गेवराई 64 केज 106 माजलगाव 34 परळी 75 पाटोदा 53 शिरूर 45 वडवणी 19

महाराष्ट्रात मागील 24 तासांत 55,411 नवे कोरोना रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 33 लाख 43 हजार 951 वर पोहोचली आहे.

दिवसभरात 309 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत आजही मोठी वाढ झाली असली तरी रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही 82.18 टक्क्यांवर पोहोचल्यामुळे राज्याला काहीसा दिलासा मिळाला आहे राज्यात सध्या 5 लाख 36 हजार 682 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

नव्या आकडेवारीसह राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 33 लाख 43 हजार 951 वर पोहोचली आहे. त्यातील 27 लाख 48 हजार 153 रुग्ण कोरोनामुक्त होऊल घरी परतले आहेत.

देशात दिड लाखाच्यावर रुग्ण संख्या

मागील 24 तासांत देशात 1,52,879 नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली असून 839 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 90,584 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अपडेटनुसार,

एकूण रुग्णसंख्या: 1,33,58,805

कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या: 1,20,81,443

सक्रीय रुग्ण: 11,08,087

मृतांचा आकडा: 1,69,275