बीड जिल्ह्यात आज पुन्हा मोठी वाढ 716 कोरोना पॉझिटिव्ह: बीड 131 तर अंबाजोगाईत 161 रुग्ण
बीड जिल्ह्यात आज दि 6 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2237 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 716 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1521 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे आतापर्यंत एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळले नव्हते ते आज दिसत आहेत बीड पाठोपाठ अंबाजोगाई आणि आष्टी व परळीत रुग्ण वाढले आहेत
आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण
अंबाजोगाई 161 आष्टी 98 बीड 131 धारूर 29 गेवराई 43 केज 64 माजलगाव 34 परळी 88 पाटोदा 31 शिरूर 31 वडवणी 6
काल दिवसभरात राज्यात ४७ हजार २८८ करोनाबाधित वाढले असून, १५५ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर १.८३ टक्के एवढा झाला आहे. राज्यात आज रोजी एकूण ४,५१,३७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
दरम्यान, आज २६ हजार २५२ रुग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत.
राज्यात आजपर्यंत एकूण २५,४९,०७५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८३.३६ टक्के एवढे झाले आहे.
देशात कोरोनाचे 96 हजार 982 रुग्ण
गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 96 हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत. देशात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होताना दिसत आहे.
गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 96 हजार 982 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1 कोटी 26 लाख 86 हजार 49 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात 446 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे एकूण मृतांची संख्या 1 लाख 65 हजार 547 इतकी झाली आहे. सोमवारी देशात सर्वाधिक म्हणजेच 1 लाख 3 हजार 558 रुग्ण आढळले होते. देशात गेल्या 27 दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.