बीड

बीड जिल्ह्यात आज पुन्हा मोठी वाढ 575 कोरोना पॉझिटिव्ह: बीड 150 तर अंबाजोगाईत 127 रुग्ण

बीड जिल्ह्यात आज दि 5 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2275 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 575 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1680 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे 10 दिवसानंतर आज शहरात ठिकठिकाणी मोठी गर्दी दिसून येत होती बाजार पेठेत काहीजण विना मास्क फिरताना दिसत होते,लॉक डाऊन नको असेल तर किमान नियम पाळायला हवेत मात्र तसे दिसत नाही

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 127 आष्टी 80 बीड 150 धारूर 11 गेवराई 18 केज 50 माजलगाव 35 परळी 48 पाटोदा 29 शिरूर 24 वडवणी 3

सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात

देशात रविवारी दिवसभरात आढळून आलेल्या रुग्णसंख्येमध्ये सर्वाधिक संख्या महाराष्ट्रातील आहे. राज्यात ४ एप्रिल रोजी तब्बल ५७ हजार नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. राज्यात ५७ हजार ७४ नवीन करोनाबाधित आढळले असून, २२२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर १.८६ टक्के असून, आतापर्यंत ५५ हजार ८७८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या ४,३०,५०३ रुग्ण उपचार घेत आहेत.

देशात गेल्या २४ तासांत एक लाख ३ हजार ५५८ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. गेल्या २४ तासांत ५३ हजार ८४७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ४७८ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या एक कोटी २५ लाख ८९ हजार ६७ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत एक कोटी १६ लाख ८२ हजार १३६ जणांनी कोरोनावर मात केली. देशभरात सध्या सात लाख ४१ हजार ३० रुग्ण उपचाराधीन आहेत. तर एक लाख ६५ हजार १०१ रुग्णांचा मृत्यू झालाय.