गृहमंत्री देशमुख यांच्यावरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची सीबीआयने चौकशी करावी- मुंबई उच्च न्यायालय
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपये वसुलीच्या कथित आरोपाप्रकरणी हायकोर्टात आज सुनावणी घेण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची सीबीआयने 15 दिवसात प्राथमिक चौकशी करावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपये वसुलीच्या कथित आरोपाप्रकरणी उच्च न्यायालयात परमबीर यांनी याचिका दाखल केली आहे.
ही याचिका सुनावणी योग्य आहे की नाही? या प्रकरणी करण्यात आलेल्या सीबीआय चौकशीच्या मागणीत तथ्य आहे की नाही यावर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांनी सोमवार, 5 एप्रिल रोजी निकाल दिला आहे