उद्यापासून कडक निर्बंध लागू होणार:राज्यात शनिवारी व रविवारी लॉकडाऊन
राज्यात उद्यापासून कडक नियम लागू होणार असून शनिवार आणि रविवार दोन दिवसांचा कडक लॉक डाऊन लागू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे शुक्रवारी रात्री 8 पासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत हा सम्पूर्ण लॉक डाऊन असेल
चित्रपटगृह, नाट्यग्रह, उद्याने सर्व मैदाने,बंद राहतील
धार्मिक स्थळांसाठी नवीन गाईडलाईन जाहीर होणार असून कठोर निर्बंध कठोर अंमलबजावणी उद्या रात्री 8 वाजे पासूनच सुरू होणार आहे अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहतील
रिक्षा मध्ये दोनच प्रवाशांना परवानगी राहील सार्वजनिक वाहने सुरू राहणार
दुकाने व हॉटेल्सना फक्त पार्सल सेवा चालू ठेवता येईल
तसेच मॉल, रेस्टॉरंट,बार रात्री 8 नंतर बंद राहणार
शनिवार आणि रविवारी सम्पूर्ण दिवस कर्फ्यु लागू केला जाणार आहे
आठवडी बाजार बंद राहणार ऑफिसेस 50 टक्के क्षमतेवर चालू ठेवता येतील
सामान्य माणसांना रात्रीची प्रवासबंदी असणार आहे. बस, टॅक्सी, रिक्षा सुरूच राहणार. पण रिक्षात प्रवास करताना फक्त दोघांना परवानगी देण्यात आली आहे. मर्यादित लोकांसह फिल्म शुटिंगला परवानगी देण्यात आली आहे.
राज्यात वीकेंडला कडक लॉकडाऊन असणार आहे. येत्या शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून त्याची अंमलबजावणी होईल. शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत लॉकडाऊन असेल, अशी माहिती मंत्री नवाब मलिक यांनी बैठकीनंतर दिली. शनिवारी व रविवारी केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्सना पार्सल आणि टेक अवे सुविधा देण्याची परवानगी असेल. कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करावं लागेल, असे मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. याबाबत सविस्तर मार्गदर्शक तत्वे लवकरच जारी करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.