बीड

बीड जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट आज 486 कोरोना पॉझिटिव्ह: बीड 120 तर अंबाजोगाईत 107 रुग्ण

बीड जिल्ह्यात आज दि 4 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2959 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 486 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2473 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे,विशेष म्हणजे लॉकडाऊनचा आजचा शेवटचा दिवस आहे,या काळातच इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे ही चिंतेची बाब आहे आज बीड आणि अंबाजोगाई मध्ये मोठी रुग्ण वाढ झाली आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 107 आष्टी 57 बीड 120 धारूर 8 गेवराई 30 केज 34 माजलगाव 37 परळी 43 पाटोदा 26 शिरूर 15 वडवणी 9

राज्यात आज ४९,४४७ नव्या रुग्णांचे निदान

गेल्या २४ तासांत राज्यात ४९ हजार ४४७ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ४७, हजार ८२७ इतकी होती. कालच्या तुलनेत ही वाढ १ हजार ६२० ने अधिक आहे, ही चिंतेची बाब आहे. या बरोबरच, गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३७ हजार ८२१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल ही संख्या २४ हजार १२६ इतकी होती. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ४ लाख ०१ हजार १७२ वर जाऊन पोहचली आहे.
राज्यात एकूण २७७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या २०२ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८८ टक्के इतका आहे. याबरोब राज्यात आज ३७ हजार ८२१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण २४ लाख ९५ हजार ३१५ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.४९ टक्क्यांवर आले आहे.