औरंगाबादमध्ये ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी कायम
औरंगाबाद: राज्य शासनाच्या आदेशानुसार “मिशन बिगीन अगेन” अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात संचारबंदीचा कालावधी वाढविण्यात आलेला असून मनाई आदेश ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहेत. त्यानुसार रात्री आठ ते सकाळी सात रोजी या कालावधीसाठी संचारबंदी आदेश लागू राहणार आहे.
जिल्ह्यातील संचारबंदी नियमात अंशत: बदत करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने काढले आहेत. जिल्हृयात ३० एप्रिलपर्यंत रात्री ८ ते सकाळी ७ या कालावधीमध्ये संचारबंदी आहे. तसेच या कालावधी अंतर्गत प्रत्येक शनिवार व रविवारी अत्यावश्यक वस्तु व सेवा वगळता संचारबंदी असेल. सर्व ज्युस सेंटर, व रसवंतीगृहे बंद राहतील, पार्संल घेऊन जाण्यास परवानगी आहे.
जिल्ह्यात सर्व आठवडे बाजार, कोचिंग क्लासेस ३० एप्रिलपर्यंत संपूर्ण बंद राहतील. नियोजित बैठका ऑनलाईन माध्यमातून घेण्यास प्राधान्य देण्यात यावे. अंशत: बदल वगळता जिल्हा प्रशासनाने २७ मार्च रोजीच्या आदेशामधील इतर सर्व अटी व शर्ती कायम राहणार आहे.