ऑनलाइन वृत्तसेवामहाराष्ट्रमुंबई

दोन दिवसात लॉकडाऊन की कडक निर्बंध जाहीर करू-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात करोनाचा उद्रेक झाला असून रोज रुग्णवाढीचे धडकी भरवणारे आकडे समोर येत आहेत. करोनाला रोखण्यासाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लावण्याबरोबर मर्यादित स्वरुपाचा लॉकडाउन देखील लागू करण्यात आला. करोना असाच वाढत राहिला आणि लोकांनी काटेकोरपणे नियम पाळले नाहीत, तर राज्यात कडक निर्बंधांचा किंवा लॉकडाउनचा विचार करावा लागेल, असे संकेत राज्य सरकारने वारंवार दिले आहेत. राज्यातील एकूणच स्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधला, येत्या दोन दिवसात तज्ज्ञांशी बोलून निर्णय घेणार असल्याचे सांगून लॉक डाऊन लागू करायचा की कडक निर्बंध हे जाहीर करणार असल्याचे ते म्हणाले

करोना असाच वाढत राहिला आणि लोकांनी काटेकोरपणे नियम पाळले नाहीत, तर राज्यात कडक निर्बंधांचा किंवा लॉकडाउनचा विचार करावा लागेल, असे संकेत राज्य सरकारने वारंवार दिले आहेत.

राज्यात लॉकडाउन लागू करू नये असे विरोधकांपासून अनेक घटकांचे म्हणणे आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की,लस घेणे, चाचण्या वाढवणे हा उपाय नाही. मात्र रुग्णवाढ थांबवण्यासाठी कोणी उपाय सांगत नाही,दरदिवशी सहा लाख नागरिकांना लस देण्याची क्षमता महाराष्ट्राची आहे. पण केंद्राने तेवढा साठा पुरवायला हवा, काल एका दिवसात महाराष्ट्राने तीन लाख नागरिकांचे लसीकरण केले आहे. यात महाराष्ट्र देशात पहिले राज्य ठरले आहे, विलगीकरण बेड २ लाख २० हजार आहेत. आताच ६२ टक्के बेड भरले गेले आहेत, आयसीयू बेड राज्यात २०,५१९ आहेत, त्यातील ४८ टक्के भरले आहेत, ऑक्सिजनचे बेड ६२ हजार २५ इतके आहेत. फिल्ड रुग्णालय उभारणारे महाराष्ट्र हे देशात पहिले राज्य ठरले आहे,आपण काहीही लपवणार नाही, राज्यातील एकही रुग्ण लपवला नाही आणि लपवणारही नाही, मला व्हिलन ठरवलं गेलं तरी देखील मी काम करतच राहणार असे मुख्यमंत्री म्हणाले


सध्या राज्यात करोना चाचण्या करणाऱ्या लॅबची संख्या ५०० वर पोहोचली आहे,आरटीपीसीआर चाचण्या अधिकाधिक करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे, या पुढील काळात दररोज अडीच लाख चाचण्या महाराष्ट्रात होणार लग्न समारंभ, राजकीय कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर झाल्याने राज्यात करोना वाढला,
करोनाच्या काळातही विरोधकांचा ‘शिमगा’ सुरू असा टोला लगावला
मधल्या काळात नियम पाळण्यात शिथीलता आली,राज्यात लॉकडाउन लागू करू नये असे विरोधकांपासून अनेक घटकांचे म्हणणे आहे, लॉकडाउन नको असेल तर मास्कचा वापर करणे, योग्य ते अंतर राखणे आणि हात वारंवार स्वच्छ धुणे या गोष्टी कराव्याच लागतील असे सरकारने वेळोवेळी जाहीर केले आहे.यासाठी जनतेने आता नियम पाळावेत आणि प्रत्येकाने आपली काळजी घेऊन कोरोना हरवण्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे