बीड

बीड जिल्ह्यात आजचा आकडा चारशे कमी सात कोरोना पॉझिटिव्ह:बीडला सव्वाशे रुग्ण

बीड जिल्ह्यात आज दि 1 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2956 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 393 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2563 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 65 आष्टी 45 बीड 127 धारूर 4 गेवराई 11 केज 33 माजलगाव 34 परळी 34 पाटोदा 26 शिरूर 5 वडवणी 9

महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच मंगळवारी रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, बुधवारी पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला. राज्यात बुधवारी ३९ हजार ५४४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मंगळवारी २७ हजार ९१८ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. परंतु, बुधवारी हा आकडा जवळपास दोन हजारांनी वाढला. तसेच बुधवारी २३ हजार ६०० रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण २४,००,७२७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८५.३४ टक्के इतके आहे.

राज्यात मागील काही दिवसांत कोरोनाबाधित मृतांची संख्या वाढताना दिसत आहे. मंगळवारी १३९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. बुधवारी हा आकडा तब्बल २०० पार गेला. मागील २४ तासांत २२७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्युदर १.९४ टक्के इतका आहे.