बीड

बीड जिल्ह्यात आज सव्वा तीनशे कोरोना पॉझिटिव्ह:बीडला सर्वाधिक रुग्ण

बीड जिल्ह्यात आज दि 31 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2231 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 325 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1906 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 50 आष्टी 34 बीड 98 धारूर 4 गेवराई 21 केज 21 माजलगाव 20 परळी 41 पाटोदा 24 शिरूर 7 वडवणी 5

नव्या रुग्णांच्या तुलनेत थोडा दिलासा

मुंबई: राज्यात दररोज नव्या करोना बाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असला तरी देखील आजचा नव्या रुग्णांचा आकडा तुलनेने दिलासा देणार आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २७ हजार ९१८ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ३१, हजार ६४३ इतकी होती. कालच्या तुलनेत ही वाढ ३ हजार ७२५ ने कमी आहे, ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब आहे. या बरोबरच, गेल्या २४ तासांमध्ये एकूण २३ हजार ८२० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल ही संख्या २० हजार ८५४ इतकी होती. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ३ लाख ४० हजार ५४२ वर जाऊन पोहचली आहे.

आज राज्यात एकूण १३९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या १०२ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९६ टक्के इतका आहे. राज्यात आज २३ हजार ८२० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण २३ लाख ७७ हजार १२७ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.७१ टक्क्यांवर आले आहे.