बीड

ह भ प लक्ष्मण महाराजांच्या जाण्याने अध्यात्मिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली-माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड- जिल्ह्यात थोरला गड म्हणून रामगडावरील ह भ प लक्ष्मण महाराज यांच्या निधनाची वार्ता समजली, प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन असणाऱ्या राम गडाच्या विकासासाठी आग्रही भूमिका घेणारे आणि अध्यात्मिक क्षेत्रात राम गडाचे नावलौकिक करणारे ह भ प लक्ष्मण महाराज यांच्या निधनामुळे अध्यात्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे

बीड तालुक्यातील तीर्थक्षेत्र रामगड हा बीड जिल्ह्यात थोरला गड म्हणून ओळखला जातो प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन असणारा हा रामगड म्हणजे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते स्वर्गीय काकूंच्या कार्य काळापासून राम गडांचे आणि आमचे नाते वृद्धिंगत झाले होते स्वर्गीय काकू प्रत्येक राम नवमीला राम गडावर जाऊनच रामनवमी साजरी करत असायच्या विकासाच्या दृष्टीने काकूंनी राम गडावरील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला होता तत्कालीन काळात आमदार फंडातून निवारागृह, स्ट्रीट लाईट तसेच अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची आग्रहाची भूमिका होती मी राज्यमंत्री,पालकमंत्री असतानाच रामगडाचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश व्हावा यासाठी स्व काकूंनी आग्रह धरला होता ह भ प लक्ष्मण महाराज एक निस्वार्थ वृत्तीचे आणि समाजाला जोडून ठेवणारे व्यक्तिमत्व होते त्यांच्या मार्गदर्शनामुळे भक्ती सांप्रदायात मोठा लौकिक निर्माण झाला होता काही दिवसापूर्वीच ह भ प लक्ष्मण महाराजांनी ह-भ-प मेंगडे महाराज यांच्या उपस्थितीत उत्तराधिकारी नियुक्त करण्याची प्रक्रिया पूर्ण केली कदाचित त्यांना या गोष्टीची चाहूल लागली असावी, जेव्हा केव्हा माझी भेट व्हायची तेव्हा निस्वार्थ वृत्तीने ते गडाच्या विकासासाठी आग्रही असायचे मात्र त्यांच्या आकस्मिक निधनाने राम गडाच्या विकासाचे अनेक प्रश्न अपुरे राहिले आहेत,
आजच संत तुकाराम महाराज बीज आहे,आम्ही जातो आमुच्या गावा ||आमुचा राम राम घ्यावा||असे म्हणून संत तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केले त्याच दिवशी ह भ प लक्ष्मण महाराजांनी देखील वैकुंठ गमन केले आहे हा त्यांच्या आत्म्यासाठी पुण्य पावन योग असल्याची प्रतिक्रिया माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली आहे