बीड जिल्ह्यातील सर्व बँका व खाजगी कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या तपासण्या करा-जिल्हाधिकारी
बीड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मार्चच्या पहिल्या आठवड्या पासूनच जिल्ह्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकेतील/ खाजगी बँकेतील अधिकारी /कर्मचारी तसेच खाजगी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी हे कोविड संक्रमित येत असल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे हा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने या सर्व ठिकाणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची दिनांक 2 एप्रिल पासून अँटी जेन/rt-pcr तपासणी करून घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत दिनांक 5 एप्रिल रोजी नंतर कोणतेही अधिकारी कर्मचारी ही तपासणी न करता कार्यालयात उपस्थित राहू शकणार नाही याची बँकेच्या शाखा प्रमुखांनी तसेच खाजगी कार्यालय प्रमुखांनी नोंद घ्यावी असे आदेशात म्हटले आहे
सदरील आदेशाचे उल्लंघन करणार्याविरुद्ध तात्काळ कारवाई करत करण्यात येईल असेही म्हटले आहे