ऑनलाइन वृत्तसेवामहाराष्ट्रमुंबई

थंडावलेल्या कामांना गती देण्यासाठी निधी वितरणाचे तब्बल १२१ शासन आदेश जारी

मुंबई-करोना साथरोग, टाळेबंदी यांमुळे थंडावलेल्या महाविकास आघाडी सरकारने काहीशी आता गती घेण्यास सुरुवात के ली आहे. मागील आठवड्यात वेगवेगळ्या विषयांशी संबंधित विक्रमी शासन आदेश काढण्यात आले आहेत. २५ मार्चला १०८, तर २६ मार्चला तब्बल १२१ आदेश जारी करण्यात आले आहेत.

गेल्या आठवड्यात वेगवेगळ्या विभागांचे चढत्या क्रमाने शासन आदेश निघाले आहेत. २२ मार्चला ६८, २३ मार्चला ९१ व २४ मार्चला ८६ आदेश जारी करण्यात आले आहेत. २५ व २६ मार्चचे मिळून २२९ शासन आदेश काढण्याचे द्विशतक पार के ले आहे.

राज्य शाससकीय कार्यालयांना शनिवार २७ ते सोमवार २९ अशा सलग सुट्या आल्या होत्या. त्याआधी विविध विभागांचे २५ व २६ मार्चला मोठ्या प्रमाणावर शासन आदेश काढण्यात आले

त्यात सर्वाधिक महसूल व वन विभागांच्या आदेशांचा समावेश आहे. त्या खालोखाल गृह, कृषी, पदुम, सहकार, पणन, वस्त्रोद्योग, आदिवासी विकास विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य, नगरविकास आदी विभागांचे प्रशासकीय व वित्तीय मान्यतेचे आदेश निघाले आहेत.

महसूल विभागाचे बहुतेक आदेश प्रशासकीय स्वरूपाचे आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालये-रुग्णालयांसाठी वैद्यकीय उपकरणे-यंत्रे खरेदीला मान्यता देणारे वैद्यकीय शिक्षण विभागाने आदेश कढले आहेत. मुंबई मेट्रो कामासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाला कर्जाची रक्कम वितरित करण्यासंबंधीचे बरेच शासन आदेश आहेत. सहकारी सूत गिरण्यांना त्यांना देण्यात आलेल्या कर्जावरील व्याज सवलतीचे सहकार-पणन वस्त्रोद्योग विभागाने आदेश काढले आहेत.

बहुतांश विभागांचे अर्थसंकल्पात वेगवेगळ्या योजनांसाठी मंजूर केलेल्या निधी वितरणाशी संबंधित शासन आदेश आहेत. दोन दिवस शंभरच्या वर आदेश काढून महाविकास आघाडी सरकारने विक्रम केला आहे.