बीड

बीड जिल्ह्यात 284 कोरोना पॉझिटिव्ह:आकडा कमी होईना

बीड जिल्ह्यात आज दि 28 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2983 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 284 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2699 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 73 आष्टी 30 बीड 59 धारूर 8 गेवराई 5 केज 13 माजलगाव 32 परळी 37 पाटोदा 17 वडवणी 4,शिरूर 6

महाराष्ट्रात करोनाचा कहर; ३ लाखांच्यावर अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबईः राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे.24 तासात राज्यात ३५ हजार ७२६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर, १६६ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.
राज्यात करोना रुग्णसंख्येचा आलेख वाढतच आहे. काल रुग्णसंख्येनं नवा उच्चांक गाठल्यानंतर आजही रुग्णांची संख्या चिंता वाढवणारीच आहे. करोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात कालरात्रीपासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानंतर हाती आलेले करोनाचे आकडे चिंता वाढवणारे आहेत.
राज्यात 24 तासात ३५ हजार ७२६ नवीन रुग्ण सापडले आहेत. आज १६६ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं राज्यातील मृत्यूदर २. ०२ टक्के इतका झाला आहे. दिवसभरात १४ हजार ५२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २३ लाख १४ हजार ५७९ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता तीन लाखांवर गेली आहे. आजच्या आकडेवारीनुसार सध्या ३ लाख ०३ हजार ४७५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.