बीड

कोरोनाचा आकडा आजही वाढताच:बीड जिल्ह्यात 375 कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज दि 27 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2713जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 375 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2338 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 75 आष्टी 30 बीड 112 धारूर 12 गेवराई 24 केज 27 माजलगाव 25 परळी 38 पाटोदा 23 वडवणी 5,शिरूर 4

राज्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. गेल्या २४ तासांत ३६ हजार ९०२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ११२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १७ हजार १९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एकूण कोरोनाबाधितांची संख्या २६ लाख ३७ हजार ७३५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५३ हजार ९०७ जणांचा मृत्यू झाला असून २३ लाख ५६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.२ टक्के एवढे झाले आहे. तर मृत्यूदर २.४ टक्के एवढा आहे. एकंदरीत राज्यातील रिकव्हरी रेट कमी होत असून मृत्यूदरात वाढ होताना दिसत आहे.