बीड

कोरोनाचा कहर वाढला:बीड जिल्ह्यात 383 कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज दि 26 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2605 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 383 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2222 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 100 आष्टी 30 बीड 119 धारूर 10 गेवराई 29 केज 28 माजलगाव 27 परळी 33 पाटोदा 9 वडवणी 6

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची संख्या दररोज झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासात राज्यात 31,855 कोरोनाग्रस्त आढळले असून हा गेल्या वर्षभरातील उच्चांकी आकडा आहे. तसेच 95 हून अधिक जणांचा मृत्यू आहे. कोरोनाग्रस्तांची ही वाढती आकडेवारी धक्कादायक आहे.

महाराष्ट्रात बुधवारी 15098 कोरोनाग्रस्त बरे झाले आहेत. सध्या महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट हा 88.21 टक्के असून मृत्यूदर 2.09 टक्के आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात 1कोटी 87 लाख 25 हजार 307 चाचण्या झाल्या असून त्यातील 25 लाख 64 हजार 881 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

सध्या महाराष्ट्रात 12 लाख 68 हजार 094 लोकं होम क्वारंटाईनमध्ये आहेत.