बीड

“लाॅकडाऊन”म्हणजे सरकारी बंदच:ही तर मनमानीच सुरू-माजीमंत्री सुरेश नवले

बीड-गोरगरीब जनता,त्रस्त झालेले बेरोजगार युवक,उपाशी पोटी झोपणारे मजूर,छोटे मोठे व्यापारी आणि हातावर पोट असणारे लोक वर्ष भरापासून या सरकारी बंदच सामना करत आहे,म्हणजेच लॉक डाऊन,हाच एक पर्याय समजून जो जनतेवर लादला जात आहे का तर कोरोना नाहीसा होतो म्हणून पण याचे परिणाम काय होत आहेत हे कुणीही पाहायला तयार नाही आधी लोकांची व्यवस्था करा मगच लॉक डाऊन ची मनमानी करा असा संतप्त सवाल माजीमंत्री सुरेश नवले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे त्यांच्या नावाने ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे

गेली वर्षभर जवळ पास सरकारी बंद,महाराष्ट्राच्या वाट्याला आला.बंद मुळे कोरोना आटोक्यात आला असे असते तर कोरोना दिसायलाच नको होता.पण “राष्ट्रीय तज्ञ”सल्ले देतात आणि शासन अमलबजावणी करते असे दिसते.विसकटलेली आर्थिक घडी पुर्वपदावर येऊ
लागलेली असताणाच पुन्हा “सरकारी बंद”चे
लोन सुरू झालेले दिसतेय.मेंढी पाठोपाठ मेंढ्या
उड्या घेतात असाच कहीसा हा प्रकार वाटतो.
आज एक जिल्हा,उद्या दुसरा जिल्हा लाॅक डाऊनचे
हे सत्र सुरूच राहणार असे दिसते.तो येतो,होतो
काहीना घेऊन जातो किंवा आल्या पाऊली रिकामाही
जातो.त्याचे नेमके निदान कळावे तरी कसे?
पण लाॅक डाऊन हेच “रामबाणऔषध” समजुन ,
त्याचा प्रयोग केला जातो.मला असे वाटते की हे
अती होते आहे.शासनाने तीन बाबी कराव्यात.
1)हातावर पोट असणा-यांसाठी”अन्न-छत्र”चालवावे.
2)व्यापा-यांचे बॅकाकडील कर्जावरील व्याज थांबवावे.
3)जेष्ठ नागरीकांना घरोपोच आरोग्य सेवा द्यावी.
आणि खुशाल “लाॅक डाऊन” ची मणंमाणी करत रहावी.असा खोचक सल्ला व मागणी माजीमंत्री प्रा.सुरेश नवले यांनी सरकारकडे केली आहे