बीड

बीड जिल्ह्यातील लॉकडाऊनच्या नियमात अंशतः बदल जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

बीड- जिल्ह्यात आज गुरुवारी मध्यरात्रीपासून दिनांक 4 एप्रिल रात्री बारा वाजेपर्यंत लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे मात्र सध्या परीक्षा मूल्यमापन मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांनी विद्यापीठाच्या दिनांक 16 मार्च 2021 पासून सुरू असलेल्या परीक्षांसाठी बीड जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात परीक्षा घेण्यास परवानगी देण्यात यावी अशी विनंती केल्यावरून जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी लोक डाऊन च्या नियमात अंशतः बदल केला असल्याचे आदेश दिले आहेत

महाविद्यालय शाळा आयटीआय कृषी महाविद्यालय अभियांत्रिकी व इतर शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेस व प्रवेशास नियुक्त अधिकारी कर्मचारी प्राध्यापक विद्यार्थी यांना केवळ परीक्षेस आणि प्रवेशास उपस्थित राहण्यासाठी मुभा देण्यात आली आहे संबंधितांनी आपले ओळखपत्र नियुक्तीपत्र किंवा आधार कार्ड सोबत ठेवणे बंधनकारक राहील बीड जिल्ह्यातील सर्व औषधालय मेडिकल दुकाने 24 तास चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे ्याचबरोबर शेतीकामासाठी ट्रॅक्‍टर पूर्ण बंद राहतील असे आदेश देण्यात आले होते ात्र त्यातही अंशतः बदल करण्यात आला असून शेती मशागतीसाठी ट्रॅक्‍टर साठी परवानगी देण्यात आली आहे संचारबंदी च्या दरम्यान सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालय शासनाच्या नियमाप्रमाणे चालू ठेवण्याचे आदेश ही देण्यात आले आहेत याबाबत जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी तसे आदेश जारी केले आहे