बीड

बीड जिल्ह्यात 10 दिवसाचा लॉकडाऊन पण गुरुवारपासून

बीड जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आजच्या बैठकीत बीड जिल्हा 10 दिवसासाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून हा लॉकडाऊन गुरुवारी मध्यरात्री पासून लागू होणार असल्याची माहिती मिळत आहे पालकमंत्री व विभागीय आयुक्त यांच्या परवानगी नंतरच जिल्हाधिकारी रविंद्र जगताप हे अधिकृत आदेश जाहीर करतील

बीड जिल्ह्यामध्ये गेल्या आठवडाभरामध्ये  मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आढळून येत आहे. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. कोरोना पसरू नये यासाठी जिल्हा प्रशासन गंभीर झाले. आज झालेल्या बैठकीत बीड जिल्हा दहा दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याचा प्रशासन विचार करत आहे. परवापासून दहा दिवसासाठी बीड जिल्हा लॉकडाऊन होवू शकतो अशी खात्रीशीर माहिती आहे.
बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा कोरोनाना डोके वर काढले आहे. शहरासह ग्रामिण भागात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. बीड आणि अंबाजोगाई तालुक्यात तर परिस्थिती चिंताजनक झाली आहे. मृत्युचा दरही वाढत आहे. शासकीय रूग्णालय खचाखच भरले आहेत. अशा परिस्थितीमध्ये कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाची महत्वपूर्ण बैठक झाली. बीड जिल्ह्यात दहा दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याबाबत प्रशासन निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. परवा रात्रीपासून दहा दिवसासाठी लॉकडाऊन होणार असल्याची खात्रीशिर माहिती मिळत आहे.