बीड

बीडला दिलासा: तर जिल्ह्यात 207 कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज दि 23 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1946 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 207 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1739 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 56 आष्टी 17 बीड 42 धारूर 8 गेवराई 9 केज 11 माजलगाव 25 परळी 15 पाटोदा 12 शिरूर 8 वडवणी 4

राज्यात २४,६४५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २५,०४,३२७ झाली आहे. राज्यात २,१५,२४१ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ५८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ५३,४५७ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१३ टक्के एवढा आहे.

राज्यात आज ५८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई १०, नाशिक ६, पिंपरी-चिंचवड ४, औरंगाबाद ३, नांदेड ५, अमरावती ४, नागपूर १२ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ५८ मृत्यूंपैकी ४४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
आज १९,४६३ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २२,३४,३३० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.२२ टक्के एवढे झाले आहे.