बीड

बीड शहरात शतकपार तर जिल्ह्यात 239 कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज दि 22 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2179 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 239 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1940 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 43 आष्टी 15 बीड 106 धारूर 12 गेवराई 10 केज 20 माजलगाव 11 परळी 15 पाटोदा 2 शिरूर 3 वडवणी 2

गेल्या २४ तासांत राज्यात ३० हजार ५३५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ९९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २४ लाख ७९ हजार ६८२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५३ हजार ३९९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत ११ हजार ३१४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण २२ लाख १४ हजार ८६७ कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.३२ टक्के एवढे झाले आहे.राज्यात आज रोजी एकूण २ लाख १० हजार १२० Active रुग्ण आहेत.