बीड

जिल्ह्यात कोरोनाचा कहर:बीड शहरात 158 तर जिल्ह्यात 336 कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज दि 21 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1708 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 336 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1372 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 71 आष्टी 18 बीड 158 धारूर 2 गेवराई 8 केज 20 माजलगाव 23 परळी 15 पाटोदा 15 शिरूर 1 वडवणी 5

मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) काल १३,५८८ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २२,०३,५५३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.९७ % एवढे झाले आहे.शनिवारी राज्यात २७,१२६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात ९२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर २.१८ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८२,१८,००१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २४,४९,१४७ (१३.४४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात आज रोजी एकूण १,९१,००६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मागील चोवीस तासांत 40,953 नविन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर 188 लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर 23,653 लोकं बरे होऊन घरी गेले आहेत. याआधी 28 नोव्हेंबर 2020 ला 41,810 कोरोना रुग्ण सापडले होते.

देशात आतापर्यंत एक कोटी 15 लाख 55 हजार 284 रुग्णांची नोंद झाली आहे. तर एक लाख 59 हजार 558 लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. तेच एक कोटी 11 लाख 7 हजार 332 लोकं कोरोनावर मात करत बरे झाले आहेत. सध्या देशात कोरोनाबाधित अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढलेली असून ती 2 लाख 88 हजार 394 झालेली आहे.