आरोग्यविशेष वृत्त

का येते तोंडातून दुर्गंधी:तोंडाच्या दुर्गंधीमुळे भोगावे लागू शकतात वाईट परिणाम

आपण कितीही स्मार्ट किंवा सुंदर दिसत असलात तरीही जर तुमच्या तोंडातून घाण वास येत असेल तर लोक केवळ आपल्यापासून अंतरच ठेवणार नाहीत तर आपल्याशी बोलण्यासही तयार होणार नाहीत. आपल्यापैकी बर्‍याच जणांना असे वाटत असेल की हे ब्रश न केल्यामुळे किंवा हिरड्यां संबंधित समस्यांमुळे होत असेल. पण हे कारण पूर्णपणे बरोबर नाही. होय, हिरड्यांशी संबंधित समस्या देखील एक कारण असू शकते पण हे एकमेव कारण नाही.
तर अशी इतर काही सामान्य कारणे देखील आहेत ज्यामुळे तोंडातून दुर्गंधी येते. चला तर आज विस्तारपूर्वक जाणून घेऊया की तोंडातून दुर्गंधी का येते आणि त्यातून मुक्त होण्यासाठी कोणते मार्ग आहेत? असे काही घरगुती उपाय आहेत ज्याद्वारे ही समस्या दूर होऊ शकते आणि हे डेंटिस्टने सांगितले आहे.

का येते तोंडातून दुर्गंधी
चहा, कॉफी किंवा कांदा आपल्या तोंडातून घाण वास येऊ लागला तर त्यामागील सर्वात मोठे कारण आपले खाणपान असू शकते. आपण जर जास्त प्रमाणात चहा, कॉफी, कांदा आणि लसणाचे सेवन करत असाल तर त्यामुळे तोंडाला दुर्गंधी येऊ शकते. तोंडाला दुर्गंधी येण्याचे अजून एक कारण लाइफस्टाइल देखील असू शकते. जर तुमची जीवनशैली चांगली नसेल, म्हणजेच झोपायची किंवा उठण्याची वेळ योग्य नसेल तर तुम्हाला सहाजिकच ही समस्या जाणवू शकते.

शरीराच्या आतमध्ये उद्भवणारे बरेच रोग किंवा इतर समस्या देखील श्वासांतील दुर्गंधीस कारणीभूत ठरू शकतात. उदाहरणार्थ, गॅस किंवा अॅसिडीटीशी निगडीत समस्या, फुफ्फुसांशी संबंधित एखादी समस्या, श्वास घेण्यास त्रास होण्याची समस्या, अन्न योग्य प्रकारे न पचण्याची समस्या या सर्व समस्या तोंडाच्या दुर्गंधीचे कारण असू शकतात. आज कोविड-19 (covid19) मुळे मास्क घालणे अत्यंत महत्वाचे झाले आहे. ज्यामुळे जेव्हा आपण श्वास घेता तेव्हा तोंडातून निघणारी हवा परत तोंडात जाऊ लागते. यामुळे देखील तोंडाला वास येतो. तोंडाचा दुर्गंध दूर करण्याचे उपाय जाणून घेऊया

केवळ तोंडच नव्हे तर संपूर्ण शरीराची काळजी घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे व्यायाम होय. आपल्या दैनंदिन कामातून थोडा वेळ जर तुम्ही आपल्या शरीरास निरोगी ठेवण्यासाठी घालवला तर यामुळे आपल्या तोंडाचा वास दूर करण्यास देखील मदतच होईल आणि आपण अधिक तंदुरुस्त व्हाल. आजकालची जीवनशैली आरोग्याशी संबंधित समस्यांसाठी सर्वात जास्त जबाबदार आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही एक योग्य दिनक्रम अवलंबता आला तर त्याचा नक्की अवलंब करा. सकाळी लवकर उठून रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही रात्रपाळीचे काम करत असाल तर रात्री कॉफी किंवा चहाऐवजी फळांचा व भाज्यांचा ज्यूस पिण्यास सुरुवात करा.

तोंडाच्या दुर्गंधाने ग्रस्त असलेल्या लोकांना आपल्या खाण्यापिण्याची अधिक काळजी घ्यावी लागेल. आपण जे खात आहात त्यामुळे तोंडाला दुर्गंधी येण्याची समस्या होते. अशा परिस्थितीत आपण गोड खाणं टाळावे आणि चहा किंवा कॉफीचे सेवन देखील कमी करावे. याव्यतिरिक्त जंक फुडचं सेवन देखील बंद करा. यामुळे तोंडाच्या दुर्गंधीची समस्या दूर होऊ शकते.

तोंडाच्या दुर्गंधीपासून मुक्त होण्यासाठी भरपूर पाणी प्या. तुम्ही जास्त पाणी पिऊन हायड्रेटेड राहिल्यास तोंडाच्या दुर्गंधीपासून मुक्तता देखील मिळू शकते. टीप – जर आपल्या दिनचर्येपासून आहारा पर्यंत सारं काही योग्य असेल आणि तुम्हाला आरोग्याची इतर कोणतीही समस्या देखील नसेल तर दुर्गंध दूर करण्यासाठी आपल्याला डॉक्टरकडेच जावे लागेल. हे लक्षात ठेवावे की वर दिलेल्या उपायांमुळे कोणताही रोग बरा होऊ शकत नाही. कोणतीही समस्या आढळून आल्यास कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.