बीड

आजही बीड शहरासह जिल्ह्याभरात 294 कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज दि 19 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1911 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 294 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 897 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 58 आष्टी 33 बीड 117 धारूर 7 गेवराई 14 केज 10 माजलगाव 26 परळी 22 पाटोदा 1 शिरूर 4 वडवणी 2

राज्यात चिंताजनक स्थिती

गेल्या काही दिवसांत राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस सातत्याने वाढताना पाहायला मिळत आहे. राज्याबाबत आज (१८ मार्च) मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल 25 हजार 833 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनास्थिती आता चिंताजनक होताना दिसत

राज्याच्या कोरोनास्थितीबाबत जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार एक दिलासादायक बाब अशी की, गेल्या २४ तासांत राज्यात 12 हजार 764 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर चिंताजनक गोष्ट अशी की, याच एक दिवसात राज्यात 58 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. सद्यस्थितीत राज्यात सध्या 1 लाख 66 हजार 353 रुग्णावर उपचार सुरु आहेत.