बीड

बीड शहरासह जिल्ह्याभरात 234 कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज दि 18 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1903 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 234 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1669 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 33 आष्टी 17 बीड 91 धारूर 15 गेवराई 4 केज 5 माजलगाव 20 परळी 25 पाटोदा 14 शिरूर 7 वडवणी 3

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची गेल्या २४ तासातील संख्या तब्बल ३० टक्यांनी वाढली आहे. बुधवारी (दि. १७) २३ हजार १७९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. केंद्र सरकारने महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे काही दिवसांपूर्वीच सांगितले होते. महाराष्ट्रात सर्वात जास्त मुंबईत कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ८४ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे

सध्या राज्यातील मृत्यूदर २.२४ टक्के एवढा आहे. याशिवाय, राज्यात आज रोजी एकूण १,५२,७६० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

नवी दिल्ली – देशात गेल्या 24 तासांत करोनाचे 28 हजार 903 नवीन रूग्ण आढळून आले आहेत. एकाच दिवशी इतक्‍या मोठ्या प्रमाणात करोना रूग्ण आढळून येण्याचा सन 2021 या नवीन वर्षातील हा पहिलाच प्रकार आहे. त्यामुळे देशातील एकूण करोना रूग्णांची संख्या आता 1 कोटी 43 लाख 8 हजार 734 इतकी झाली आहे.

तसेच गेल्या 24 तासांत करोनाचे 188 रूग्ण दगावल्याने करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता 1 लाख 59 हजार 44 इतकी झाली आहे. गेल्या आठवडा भरात देशातील करोना रूग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात करोना लसीकरणाचे प्रमाण वेगाने वाढत असले तरी त्याच प्रमाणात करोनाचे नवीन रूग्णही आढळून येत असल्याने सरकारी यंत्रणांची पुन्हा तारांबळ सुरू झाली आहे.