बीड

बीड जिल्ह्यातील नियमांमध्ये थोडा बदल खानावळ हॉटेल रेस्टॉरंट टपरी 50%क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी

बीड- बीड जिल्ह्यात काही दिवसापूर्वी जिल्ह्यातील सर्व हॉटेल खानावळ चहाचे हॉटेल बार रेस्टॉरंट पान टपरी पूर्णतः बंद करून फक्त पार्सल सेवेसाठी सुरू ठेवण्याचे आदेश पारित केले होते ते आता सर्व 50 टक्के क्षमतेने चालू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहे

बीड जिल्ह्यात कोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी बीड जिल्ह्यातील सर्व हॉटेल खानावळ चहाचे हॉटेल बार रेस्टॉरंट पान टपरी पूर्ण बंद करून केवळ पार्सल सुविधा चालू राहील असे आदेश पारित केले होते मात्र आता हे सर्व 50 टक्के क्षमतेने चालू ठेवता येणार आहेत मात्र यासाठी नियम पाळणे बंधनकारक राहणार आहे विनामास्क परवानगी देण्यात येऊ नये तापमान तपासूनच हॉटेलमध्ये प्रवेश द्यावा सॅनि टायझर ची व्यवस्था करण्यात यावी

सामाजिक आंतर पाळणे मास्क वापरणे हे पाहण्यासाठी पुरेशी यंत्रणा उपलब्ध करावी सदरील आदेशाचा भंग झाल्यास संबंधित अस्थापना केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे बंद करण्यात येईल तसेच जागा मालकावर ही कारवाई करण्यात येणार आहे याचबरोबर सर्व शॉपिंग मॉल यांनी खालील निर्बंध पळून चालू ठेवावेत मास्क वापरणे बंधनकारक तापमान तपासूनच प्रवेश सॅनिटायझर ची व्यवस्था करणे मॉल व्यवस्थापनाने मॉल मधील सिनेमागृह रेस्टॉरंट अथवा इतर आस्थापना बाबत वर नमूद केल्याप्रमाणे निर्बंधांचे पालन करावे

सामाजिक सांस्कृतिक राजकीय धार्मिक सभांना परवानगी नाही सदर आदेशाचा भंग झाल्यास संबंधित असताना केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे बंद करून कायद्याअंतर्गत दंड आकारण्यात येणार आहे

जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालय फंक्शन हॉल व इतर कार्यक्रम दिनांक 18 मार्चपासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले होते तेही आता चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे लग्नसमारंभासाठी पन्नास व्यक्ती उपस्थिती बंधनकारक राहील व अंत्यविधीसाठी 20 व्यक्तींची उपस्थिती असावी ग्रह विलगीकरण करण्यासाठी निर्बंध पाळून परवानगी देण्यात यावी वैद्यकीय व्यवसाया मार्फत निरीक्षण ठेवण्यात आले आहे याची माहिती संबंधित स्थानिक प्रशासन देण्यात यावी ग्रहविलगीकरण करण्याच्या ठिकाणी निदर्शनास येईल अशा जागेवर 14 दिवसांसाठी बाधित रुग्ण असल्यास फलक लावण्यात यावा रुग्णाच्या हातावर ग्रह विलगीकरण करण्याचा शिक्का मारण्यात यावा

संबंधित रुग्णाच्या कुटुंबीयांनी शक्यतो बाहेर जाणे टाळावे तसेच बिना मास्क बाहेर पडू नये निर्बंधांचे पालन न झाल्यास स्थानिक प्रशासनाने नेमून दिलेल्या सेंटर मध्ये अशा बाधित रुग्णांची रवानगी करावी आरोग्यविषयक व इतर जीवनावश्यक सेवा देणाऱ्या स्थापना वगळता इतर सर्व कार्यालय 50% उपस्थित चालू करावे शक्यतो घरून कामे करण्यास प्राधान्य देण्यात यावी या आदेशाचा भंग झाल्यास संबंधित कार्यालय केंद्र शासनाच्या अधिसूचनेत प्रमाणे बंद करण्यात येईल

धार्मिक संस्था व्यवस्थापनाने येणाऱ्या भाविकांच्या प्रतिष्ठा संख्येबाबत मर्यादा ठरवून घ्यावी सामाजिक आंतर पाळणे शक्य होईल त्याकरता ऑनलाईन आरक्षण सुविधा चालू करावी अशा ठिकाणी प्रवेश देण्याबाबत निर्बंधांचे पालन करण्यात यावे सदरील आदेशाचे पालन दिनांक 31 मार्च 2021 पर्यंत अंमलात राहतील व सर्व विभागांनी वरील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर अंमलबजावणी करावी असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आज दिले आहेत