बीड

बीड जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच:आज 283 कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज दि 16 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2625 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 283 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2342 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 58 आष्टी 15 बीड 94 धारूर 5 गेवराई 15 केज 14 माजलगाव 41 परळी 24 पाटोदा 10 शिरूर 3 वडवणी 4

राज्यात १५ हजार ५१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १० हजार ६७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत राज्यात २१ लाख ४४ हजार ७४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट हा ९२.०७ टक्के इतका आहे. तर राज्यात आज ४८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर हा २.२७ टक्के इतका आहे. राज्यात आतापर्यंत १ कोटी ७६ लाख ९ हजार २४८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यातील २३ लाख २९ हजार ४६४ कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

राज्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता सध्या राज्यात १ लाख ३० हजार ५४७ अँक्टिव्ह रुग्ण आहेत.

गेल्या 24 तासात भारतात 26,291 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 118 नागरिकांचा मृत्य झाला आहे. तर 17,455 रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय.

भारतात कोरोनाचे 1,13,85,339 रुग्ण झाले असून एकूण सक्रीय रुग्ण संख्या 2,19,262 झाली आहे. एकूण 1,10,07,352 नागरिक बरे झाले आहेत. देशात मृतांचा आकडा 1,58,725 आहे. आतापर्यंत देशात 2,99,08,038 नागरिकांचे लसीकरण झाले. ही माहिती केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली.भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका दिवसात एकूण 7 , 03 , 772 नमुन्यांची तपासणी केली.