ऑनलाइन वृत्तसेवापुणे

बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता

अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे आणि दक्षिणेकडून येणारे वारे एकत्रित येणार असल्यानं होणाऱ्या आंतररक्रीयेच्या प्रभावामुळे पोषक स्थिती असल्याची माहिती पुणे वेधशाळेकडून देण्यात आली आहे. यामुळे 18 ते 21 या तीन दिवसात मध्य महाराष्ट्रासह, मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर विदर्भात काही ठिकाणी गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी बीडमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे

देशात महाराष्ट्रासह मध्ये प्रदेशमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात तर वादळी वाऱ्याचा पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. होसाळीकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, “हवामानातील बदलामुळे विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 18-21 मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊसाची शक्यता आहे.”

महाराष्ट्रात मार्च ते मे हा पूर्वमोसमी पावसाचा काळ समजला जातो.या तीन महिन्यांच्या काळात वाढत्या उष्णतेमुळे समुद्रामधून बाष्प निर्मितीमुळे कमी दाबाचापट्टा निर्माण होतो. सध्या पश्चिमी चक्रवातामुळे उत्तर भारतामध्ये देखील अनेक राज्यांमध्ये हा पाऊस बरसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातही 3 दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसू शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे. यामध्ये विदर्भात गारपीटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.